- स्थान: शिरोडा हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: शिरोडा ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: शिरोडा ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी वेळागर समुद्रकिनारा आहे.
- गावातील प्रमुख पिके: भात शेती, मीठउत्पादन, माडबागायती.
- उद्योगधंदे: मच्छीमारी, काथ्याउद्योग.
शिरोडा गावाची माहिती
पारतंत्र्य काळात ‘इंग्रजांनो या हिंदुस्थानातून चालते व्हा’ अशी आरोळी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी असहकार, सत्याग्रहाची हाक दिली, नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले आणि या लढ्यात हजारो हिंदुस्थानी लोकांनी जिवाची – संसाराची पर्वा न करता उडी घेतली. केवळ आम्ही जिंकणार आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवुन देणार या इर्षेने आणि धैर्याने. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आदेशाने गुजरात राज्यात दांडी तर महाराष्ट्र राज्यात शिरोडा येथे देशपातळीवरील मीठ सत्याग्रह झाला. तसेच निसर्गरम्य समुद्रकिनारा, मिठागर, सुरूचे वन इ. साठी प्रसिद्ध असे गाव आहे.
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत शिरोडा
स्थापना – ३० मार्च १९४१
0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण वाड्यांची संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण शाळा व कॉलेज
0
एकूण अंगणवाडी
एकूण धार्मिक स्थळे
सार्वजनिक विहिरी (जि. प.)
खाजगी विहिरी
नळयोजना कनेक्शन
