प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग
- सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
- उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
- ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
- ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात.
- ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
- ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
- ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते.

श्री. सच्चिदानंद तुकाराम परब
प्रशासक
श्री. स्वप्नील न्हानु जाधव
ग्रामपंचायत अधिकारीग्रामस्तरीय शासकीय अधिकारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. सच्चिदानंद तुकाराम परब | प्रशासक | – |
| ०२) | श्री. स्वप्नील न्हानु जाधव | ग्रामपंचायत अधिकारी | – |
ग्रामपंचायत कर्मचारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद |
|---|---|---|
| ०१) | श्री. यशवंत चंद्रकांत कुबल | शिपाई कम वसुली कारकून |
| ०२) | श्री. संदेश वसंत मोचेमाडकर | पाणीपुरवठा कर्मचारी |
| ०३) | कु. स्मिता विश्राम नाईक | संगणक परिचालक |
| ०४) | कु. स्नेहा सुरेश गावडे | कार्यालयीन सहाय्यक |

