पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण)
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
 
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN)
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि घरगुती गरजांसाठी आर्थिक मदत पुरवली जाते.
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)
ग्रामीण कुटुंबांना आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.
 
पंतप्रधान पिक विमा योजना 
नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते.
 
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM)
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वयं-सहायता गट तयार करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
 
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 
ग्रामीण भागात शौचालये बांधण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रोत्साहन दिले जाते.
 
पंतप्रधान कृषी सिंचन योजना
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सिंचनाच्या सुविधा पुरवणे. 
सिंधुरत्न समृद्ध योजना
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील रहिवाशांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
 
संजय गांधी निराधार योजना
निराधार व्यक्तींना आर्थिक मदत पुरवली जाते. यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि विधवा निवृत्तीवेतन योजना यांचा समावेश आहे.
 
प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान
तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.
 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि पोषण सुधारणे. पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट बँक खात्यात दिले जातात.
जिल्हा परिषद स्वनिधी योजना
जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबविल्या जातात, उदा. दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी ४०% अनुदान.
 
महिला व बालकल्याण योजना
महिलांना स्वयंरोजगार आणि तंत्र शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना जिल्हा परिषद राबवते.

ग्रामपंचायत शिरोडा

शिरोडा ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय शिरोडा
गाव : शिरोडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २२७२२८
ई-मेल : gpshiroda@gmail.com

Scroll to Top