- स्थान: मोचेमाड हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: मोचेमाड ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: मोचेमाड ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी मोचेमाड समुद्रकिनारा आहे.
- गावातील प्रमुख पिके: भात शेती, आंबा, काजू, नारळ.
- उद्योगधंदे: शेती, मासेमारी, बागायती.
मोचेमाड गावाची माहिती
हिरव्यागार वनराईने नटलेल्या पर्वताच्या कुशीत, प्रसिद्ध अरबी सागराच्या किनारी वसलेले एक छोटस गांव म्हणजे मोचेमाड. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले जवळपास १०६७ एवढी लोकसंख्या असलेल. सुंदर निसर्ग सौंदर्य आणि शुभ्र समुद्र किनारा व गावाचे वेगळेपण दाखवून देणारी छोटी खाडी याचा शोध घेऊन महाराष्ट्र शासनाने “ पर्यटन‘’ स्थळ म्हणून निवडले. या गावाला २ कि.मी. एवढी किनारपट्टी लाभली आहे. सुर्यास्त म्हणजे समुद्र किनारपट्टीवरुन दिसणारे विलोभनीय दृष्य. समुद्रातील मच्छीमारी ही मच्छीमा-याच्या उपजिवीकेचे साधन आहे. मोचेमाड व न्हैचिआड या दोन गावांमधील दळणवळणासाठी जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे बॅरिस्टर नाथ पै पुल. या पुलामुळे नदिपात्रातून जिव मुठीत घेऊन होणारी होडी वाहतूक बंद झाली. इतर गावाशी दळणवळणाचा संपर्क वाढला. पर्यायाने गावाची विकासाशी नाळ जोडली गेली. गावात परंपरागत शेती व्यवसाय करतात. पण प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला मधील विविध संशोधनाचा फायदा करत गावात मोठ्या प्रमाणात आंबा पिक लागवड करून हा आंबा मुंबई तसेच मोठ्या शहरामध्ये पाठविण्यात गावातील आंबा व्यावसायिक आपली एक ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाला आहे. आंबा पिकाप्रमाणेच काजू लागवडही केली जात आहे.
- जवळचे प्रमुख विमानतळ : मनोहर पर्रीकर विमानतळ मोपा- गोवा
- जवळचे प्रमुख रेल्वेस्थानक : सावंतवाडी रोड- २६ किमी , कुडाळ- ३१ किमी
- जवळचे प्रमुख बसस्थानक : वेंगुर्ला – ७.६ किमी, शिरोडा – ८ किमी
- गावातील प्रमुख श्रध्दास्थान : श्री देव गिरोबा मंदिर, श्री देव दाडोबा मंदिर, श्री देवी नवलादेवी मंदिर, श्री देव करंडेखोल मंदिर
- गावातील प्रमुख पर्यटनस्थळे : श्री. देव गिरोबा मंदिर, मोचेमाड समुद्र किनारा

